• मुख्यपृष्ठ
  • सदस्य
  • परिषद
  • कार्यक्रम
  • पुरस्कार
  • संपर्क साधा
  • प्रकाशने
  • लॉगिन




अध्यक्षांचे मनोगत


डॉ मोहन निंबाळकर

"मित्रहो, दैनंदिन जीवन कल्पनेच्या पलीकडे गतिमान झाले आहे. या गतिमान जीवनशैलीत एका बाजूला नवनवीन आव्हाने, संधी आणि पादाक्रांत करण्याकरिता क्षेत्रे खुणावत आहेत तर दुसऱ्या बाजूला तणाव, अस्थिरता आणि मानसिक दौर्बाल्य डोके वर काढत आहे. बदलांकडे पाठ करण्याऐवजी त्यांना सामोरे जाण्याची गरज आहे. गरज आहे ती बदलांना सामोरे जाण्याची, जीवन कौशल्ये लक्षात घेण्याची, ती आत्मसात करण्याची, आणि अंगीकारण्याची. मानसशास्त्र विषय याकरिता उपयुक्त आहे तर मराठी मानसशास्त्र परिषद ही अशी चर्चा करण्याचे उत्कृष्ठ व्यासपीठ आहे. मानसशास्त्र विषयाच्या विद्यार्थी, संशोधक, अध्यापक, व्यावसायिक आणि अभिलाषी यांनी मानसशास्त्र विषयाचे ज्ञान भांडार समजावून घ्यावे, ते वाचकांकरिता मराठीत उपलब्ध करवून द्यावे, ही मराठी मानसशास्त्र परिषदेची भूमिका आहे. या करिता मराठी मानसशास्त्र परिषद बदलत्या काळाची गरज लक्षात घेते आणि तेच बीज विषय म्हणून घेऊन परिषदांचे आयोजन करत असते. आपण या व्यासपीठाचे सदस्य व्हा, सहभागी व्हा आणि समाज उन्नतीकरिता आपले योगदान द्या . धन्यवाद !

"मराठी मानसशास्त्र परिषद,पुणे आपले स्वागत करत आहे !!!"


घडामोडी

  • दिनांक 26 आणि 27 डिसेंबर 2025 रोजी लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय, पंचवटी, नाशिक येथे मराठी मानसशास्त्र परिषदेचे 11 वे राष्ट्रीय तसेच 38 वे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.

  • दिनांक १३ आणि १४ डिसेंबर २०२४ रोजी मराठी मानसशास्त्र परिषदेचे १० वे राष्ट्रीय आणि ३७ वे राज्यस्तरीय अधिवेशन पिपलएज्युकेशन सोसायटीचे मिलिंद महाविद्यालय, छ. संभाजी नगर येथे संपन्न होत आहे

  • दिनांक २२ आणि २३ मार्च २०२४ रोजी मराठी मानसशास्त्र परिषदेचे ०९ वे राष्ट्रीय आणि ३६ वे राज्यस्तरीय अधिवेशन रयत शिक्षण संस्थेचे भोसले कॉलेज, कोरेगाव, सातारा येथे संपन्न होत आहे

  • एनईपी अंतर्गत मानसशास्त्र विषयाची ज्ञान सामग्री मराठीत विकसित करणे विषयी आपल्या मौलिक सूचना आम्ही मागवत आहोत

  • संस्थेचे उद्दीष्ट

    • मानसशास्त्र विषयक शास्त्रीय दृष्टीकोन व विचार मराठीतून प्रस्तुत करणे.
    • मानसशास्त्राचा व्यक्तीच्या सर्वागीण जीवनात अधिकाधिक उपयोग व्हावा यासाठी प्रयत्न करणे.
    • भारतीय मानसशास्त्र विषयक समस्यांसंबंधी विवेचन व प्रबोधन करणे
    • मानसशास्त्रज्ञांना त्यांच्या व्यावसायिक जीवनात शक्य ते सहाय्य करणे
    • वरील उद्देवांशी सुसंगत व पोषक असे प्रकाशनासारखे अन्य कोणतेही कार्य करणे

    आमच्याबद्दल

    मानसशास्त्र विषयक शास्त्रीय दृष्टीकोन व विचार मराठीतून प्रसूत करणे, मानसशास्त्राचा व्यक्तींच्या सर्वांगीण जीवनात अधिकाधिक उपयोग व्हावा, भारतीय मानसशास्त्र विषयक समस्यांसंबंधी विवेचन व प्रबोधन करणे, मानसशास्त्रज्ञांना त्याच्या व्यावसायिक जीवनात शक्य ते सहाय्य करणे तसेच या उद्देशांशी पोषक प्रकाशन आणि अन्य कोणतेही कार्य करणे या प्रमुख उद्देशांना घेऊन दिनांक ३१ जानेवारी १९८८ रोजी मराठी मानसशास्त्र परिषदेची स्थापना झाली. मराठी मानसशास्त्र परिषद ही महाराष्ट्र शासन अंतर्गत नोंदणीकृत संस्था आहे.

    Quick Links

    • सदस्य
    • परिषद
    • कार्यक्रम
    • पुरस्कार
    • संपर्क साधा
    • प्रकाशने

    आमचा पत्ता:

    मराठी मानसशास्त्र परिषद,द्वारा प्रज्ञा मानस संशोधिका,ज्ञान प्रबोधिनी,साधशिव पेठ,पुणे,महाराष्ट्र ४११०३०

    फोन: ०२० २४२०७२०५ ,०२० २४२०७१४२
    वेळ सकाळी १० ते ६


    Copyright © 2023-24 All Rights Reserved by मराठी मानसशास्त्र परिषद,पुणे